-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावतीत सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन
-
अमरावतीत कॅन्सर रुग्णांसाठी नवीन हॉस्पिटल, सामान्य नागरिकांसाठी कमी दरात किंवा मोफत उपचाराची सोय
-
कॅन्सरचे वेळेवर निदान आणि उपचार सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रीडची स्थापना
-
अमरावती:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. या हॉस्पिटलच्या माध्यमातून अमरावतीतील गरजू रुग्णांना कॅन्सरच्या उपचारांसाठी सुविधा मिळणार आहे.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कॅन्सरचे योग्य वेळी निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण योग्य निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो. या उद्देशासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र शासन ग्रीड’ स्थापन करण्यात येत आहे, ज्यात कॅन्सर बरा होण्यासाठी रुग्णांना लागणाऱ्या सर्व सेवांचा समावेश असेल.
या संपूर्ण सेवेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उपयोग करून सामान्य नागरिकांनाही कमी दरात किंवा मोफत उपचार मिळण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
उद्घाटन समारंभात राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार नवनीत राणा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.












